हदगाव तालुक्यातील पिकांना पावसाचा फटका.! कापुस आणि तुरीचे प्रचंड नुकसान...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बालाजी घडबळे, नांदेड
दि. 27 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटा सह हदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली. पावसासह सुसाट्याचा वारा असल्याने तुर, कापूस, उस व इतर पिके आडवी झाली.
तर अगोदरच लाल्या रोगाने ग्रस्त असलेल्या कापसाची फुटलेले बोंडे सुद्धा कालच्या पावसाने खराब झाली आहेत. एकुणच रात्री झालेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन स्तरावर याची दखल घेऊन पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.