आग्रीम कृषी विम्यासह विविध मागण्यासाठी अमरण उपोषण करण्याचे; तालुक्यातील शेतकऱ्यानी दिले निवेदन...

आग्रीम कृषी विम्यासह विविध मागण्यासाठी अमरण उपोषण करण्याचे; तालुक्यातील शेतकऱ्यानी दिले निवेदन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातूर जिल्ह्यातील 60 मंडळात 21 तासापेक्षा अधिकचा खंड पडला म्हणून जिल्हाधिकारी लातूर यांनी SBI अग्रीकल्चर इंन्सुरंस कंपनीला सदर मंडळाला आग्रीम विमा देण्याचे आदेश देऊन ही कंपनी जाणीवपूर्वक अहमदपुर तालुक्यातील अहमदपुर, खंडाळी, अंधोरी, किनगाव, हाडोळती या मंडळाला आग्रीम देण्यास टाळाटाळ करत आहे तसेच 2020 पासून विमा वाटपात होत असलेला घोटाळ्याची चौकशी करुन शेतकऱ्यांना 2020, 2021, 2022, चा कृषी विमा देण्यात यावा

1) अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 चा आग्रीम मंजुर कृषीविमा जिल्ह्याधिकारी लातूर यांनी आध्यादेश काढुनही वाटप न करणाऱ्या एस बी आय इंन्सुरंस कंपनीवर कारवाई करुन तीचा परवाना रद्द करावा व शेतकऱ्यांना आग्रीम विमा वाटप करण्यात यावा.

2) 2020, 2021, 2022 चा  रब्बी व खरिप विमा शेतकऱ्यांना न देणाऱ्या इंन्सुरंस कंपणीवर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा.

3) यावर्षी पावसाने दडि दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात  कमालीची घट झाली आहे म्हणून एन डि आर एफ च्या नियमानुसार मदत द्यावी.

4) मा. आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबाच्या अहवालानुसार अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी.

5) सिंचन सुविधा राबवुन तालुक्यातील किंनगाव ,खंडाळी,हाडोळती,आंधोरी मंडळातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत पाणी देण्यात यावे. 

5) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नद्याजोड प्रकल्प राबवुन शेतीसाठी मोफत पाणी व मोफत विधुत देण्यात यावी. 

6)  मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मृत्यू झाल्यास वारसांना 10 लाख रुपये मदत द्यावी. 

7)  मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणी साठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी

8) खाजगी विमा कंपन्याना  कृषी विम्याची परवानगी न देता महाराष्ट्र शासनाने 100 टक्के परतावा देणारी योजना शासकिय स्वतंत्र राबवावी

9) अहमदपूर तालुक्यात सोयाबीन , दुध यावर प्रक्रिया करणारे शासकीय उद्योग उभे करण्यात यावे

10) सरसकट शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.. 

11) शेतकऱ्यांना उद्योगपती प्रमाणे सरसकट कर्ज माफी देण्यात यावी

12) आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभ मिळाला नाही त्यांना कर्ज माफी देण्यात यावी

13) रोजगार हमी योजनेवरील मजुरांचे दोन वेळा काढण्यात येणारे फोटो बंद करा

या विविध मागण्याचे निवेदन देऊन एक महिना उलटला तरी कोणत्याही विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने; आम्ही उद्या दि. 6 डिसेंबर पासून अमरण उपोषणास बसत असल्याचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

यावेळी सहदेव व्होनाळे, संतोष रेड्डी, परमेश्वर स्वामी, मौलाना बिलाल, सय्यद तबरेज, राहुल शेळके, महाळंकर हरिश्चंद्र, गुणवंतराय नारागुडे, घोडके दयानंद, पाटील चंद्रकांत, केंद्रे दगडु काशिनाथ, बालाजी केंद्रे, कमलाकर गायकवाड, घोडके पद्माकर, घोडके रामेश्वर, व्यंकटी राठोड, पिराजी राठोड, श्रीराम बोइनवाड, बालाजी मरपडवाड,गंगाधर स्वामी, निशांत हांडे, सरस्वतीबाई कांबळे, नागपुर्णे माधव, व्यंकोबा चांदेवाड, ज्ञानोबा चांदेवाड, व्यंकटेश व्हटमुर्गे, अविनाश गोरगे, रामदास रोकडे, शिवाजी टेकाळे, माधव सुर्यवंशी, नामदेव कदम, रामदास हांडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.