आत्महत्येच्या निवेदनाची 19 व्या दिवशी दखल, नांदेड जिल्हा प्रशासनाकडून शासन आपल्या दारी योजनेला हरताळ...

आत्महत्येच्या निवेदनाची 19 व्या दिवशी दखल, नांदेड जिल्हा प्रशासनाकडून शासन आपल्या दारी योजनेला हरताळ...

NEWS15 प्रतिनिधी - नांदेड

आमच्या निवेदनावर 15 दिवसात योग्य ती कारवाई करा; पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही पती / पत्नी आत्महत्या करु असा इशारा  देऊनही; दिलेल्या निवेदनाकडे तब्बल 19 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाने ढुंकुनही पाहीले नसल्याने शेतकरी कुटुंब तनावाखाली आले आहे. तर यातून शासन आपल्या दारी ही मोहीम नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय कीती गांभीर्यपूर्वक पार पाडत आहे. हे देखील याद्वारे दिसून येत आहे.

या बाबत सविस्तर माहीती अशी की.! पंचनाम्यानुसार 80 % पिक विमा न मिळाल्याने; चिंचगव्हाण येथील शेतकरी दाम्पत्य बालाजी घडबळे आणि वर्षा बालाजी घडबळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना पहीले निवेदन दि.27/03/2023 रोजी दिले. त्यानंतर दि.24/04/2023 रोजी दुसरे निवेदन देऊन कळविले की; सहा दिवसात योग्य ती कारवाई करुन पिक विमा न मिळाल्यास आम्ही दोघेही आत्मदहन करु. त्यावर 25 एप्रिल रोजी ठोस कारवाई करु असे तहसिलदार हदगाव यांनी कळविल्यानुसार; सदर शेतकरी दाम्पत्याने आत्मदहनापासुन परावृत्त केले. परंतु 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोट असून अद्यापही कारवाई होत नसल्याने, सदर दाम्पत्याने पुन्हा दिनांक 25/06/23 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे कळविले की सदर पिक विमा कंपनी व आपल्या कार्यालयाकडुन माझ्या निवेदनावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मी कर्जबाजारी झालो असून, मला पेरणीलाही पैसे नाहीत. आपण या बाबत 15 दिवसात योग्य ती कारवाई करुन  मला न्याय न मिळाल्यास मी व माझी पत्नी ना विलाजास्तव आत्महत्या करणार आहोत.

15 दिवसाची मुदत आणि शेतकऱ्याच्या जिवन मरणाचा गंभीर विषय असतांना सुद्धा; जिल्हाधिकारी कार्यालयाला तब्बल 19 दिवस याबाबत जागच आली नाही. जेव्हा शेतकऱ्याने स्वतः जाऊन विचारणा केली असता, पळापळ करुन जिल्हा कृषि अधिकारी, शेतकरी व इतर अधिकाऱ्यांना पत्र काढुन कारवाई करण्याचे कळविले. 15 दिवस वाट पाहुन विवंचनेत या शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली असती तर काय झालं असतं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रत्यक्ष 80% नुकसान होऊनही जिल्हाधिकारी पिक विमा कंपनीवर कठोर कारवाई का करीत नाहीत,असा प्रश्न हे शेतकरी दाम्पत्य विचारत आहे. यावरून शेतकऱ्यांच्या प्रति पिकविमा कंपनीसह जिल्हा कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय गांभिर्याने घेत नसल्याचे दिसुन येत आहे.

शेतकरी.!

आपण पिक विमा कंपनी, जिल्हाधिकारी व जिल्हा कृषि अधिकारी यांच्या हलगर्जीपनाला वैतागलो असून, मागिल वर्षी शेतातील घाटा व या वर्षीची दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे पुरते हतबल झालो. येत्या 15 दिवसात पिकविम्याचे पैसे खात्यात न पडल्यास कुठही आत्महत्या करुन जीवन संपवनार आहोत.

बालाजी दिगंबर घडबळे (शेतकरी ) चिंचगव्हाण ता. हदगाव