शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर.! चितेगाव फाटा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन...

शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर.! चितेगाव फाटा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : आज शुक्रवार दि.19 रोजी दिवंगत माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या पुण्यतिथी निमित्ताने; चितेगाव फाटा येथील कुलस्वामिनी लॉन्स येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भास्कर भगरे, खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव उपस्थित राहणार आहे. या शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.