अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीचा अखेर मुहूर्त ठरला,१७ फेब्रुवारीला पदाधिकारी निवडले जाणार..
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील अकोले : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी संदर्भात मागील काही दिवसांपासून कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली होती ती आता येत्या १७ फेब्रुवारीला पूर्ण होण्याची शक्यता आहे. १७ फेब्रुवारीला अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी संदर्भात आमदार डॉ.किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोक भांगरे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्या प्रमुख उपस्थिती राजूर येथील शासकीय विश्राम गृहात बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीसाठी तालुक्यातील जे पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या युवक-युवती, महिला व होतकरू कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. १७ फेब्रुवारीच्या बैठकीत तालुक्यातील इच्छुक तालुका पदाधिकारी यांच्या नियुक्त्यासाठी मुलाखती होण्याची शक्यता आहे त्यातच तालुका अध्यक्ष पदासाठी अकोले तालुक्यातील संपत नाईकवाडी सर, रवी मालूजकर,सुरेश खांडगे,भानुदास तिकांडे व संजय वाकचौरे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. यातील नक्की कोणाच्या गळ्यात तालुका अध्यक्ष पदाची माळ पडते हे १७ फेब्रुवारीलाच ठरेल.