राजकीय : खेड तालुक्याचे जेष्ठ नेते शांताराम भोसले व युवा नेते संदीप सोमवंशी यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड...!

राजकीय : खेड तालुक्याचे जेष्ठ नेते शांताराम भोसले व युवा नेते संदीप सोमवंशी यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील जेष्ठ नेते शांताराम भोसले व संदीप सोमवंशी यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. शांताराम भोसले यांची खेड तालुक्याच्या राजकारणात मोठी पकड असल्याने त्यांच्या या पदावर वर्णी लागल्यावर विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

शांताराम भोसले हे मागील ३० वर्षापासून खेड तालुक्याच्या राजकारणात असून त्यांनी आता पर्यंत दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पद, दहा वर्षे पंचायत समिती सदस्य व तीन वर्षे पंचायत समितीचे उपसभापती पद, पाच वर्षे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद, पाच वर्षे खरेदी विक्री संघांचे संचालक पद, साडेचार वर्षे खेड तालुका भाजपा तालुका अध्यक्ष पद, तीस वर्षे वाकी बुद्रुक गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांनी खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर वेगळा ठसा उमटवीला आहे. त्यातच काही दिवसापासून शांताराम भोसले हे तालुक्यातील भाजपा नेत्यांवर एकाधिकार शाही पद्धतीने काम करत असल्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून पक्षाच्या कामातून अलिप्त राहण्याची भूमिका बजावली होती. काही मागील काही दिवसात पुणे जिल्हा भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची वर्णी लागल्यनंतर त्यांनी जुने नवा असा मेळ घालून पुन्हा एकदा शांताराम भोसले यांना पुन्हा संघटनेत सक्रिये केले आहे.

 

त्याच बरोबर खराबवाडी गावचे युवा नेतृत्व व भाजपाचे जन्मताच बाळकडू असलेले संदीप सोमवंशी यांचीही भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप सोमवंशी यांनी या अगोदर भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्षपद तसेच शिरूर लोकसभेचे निवडणूक समन्वय पदे भूषविले आहे. संदीप सोमवंशी यांच्या सुविद्य पत्नी क्रांती सोमवंशी या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पद भूषवीत आहेत. त्यामुळे त्यांचाही तालुक्याच्या राजकारणात चांगला दबदबा आहे. तसेच संदीप सोमवंशी यांचे भाजपा राज्य पातळीवरील बहुतेक सगळ्याच नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने त्यांना पक्ष संघटनेत काम करताना भविष्यात मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.

पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या दोन्ही नेत्यांचे खेड तालुक्यातुन व जिल्हा पातळीवरून अभिनंदन करण्यात येत आहे.