वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा उद्या भंडारा जिल्हा दौरा...
![वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा उद्या भंडारा जिल्हा दौरा...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e473153de31.jpg)
प्रतिनिधी - साहिल रामटेके
भंडारा : वंचित बहुजन आघाडी'चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सोमवार दि. ४ मार्चला भंडारा जिल्हा दौरा असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची सभा साकोली येथील पटाचे दान एकोडी रोड येथे दुपारी 2 वाजता आदिवासी बहुजन अधिकार महासभा हे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. आदिवासी ओबीसी समाजाच्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी आदिवासी बहुजन अधिकार महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे महिला, युवा, पदाधिकारी यांनी केले आहे.