नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट...

नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांचेसह मातोश्रीवर भेट घेत आशीर्वाद घेवून आभार मानत मार्गदर्शन घेतले. 

यावेळी जायंट किलर ठरलेल्या भास्कर भगरे यांची ठाकरे यांनी या गुरुजी तुमचे अभिनंदन म्हणत त्यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक करतानाच आस्थेवाईकपने कुटुंबाची विचारपूस केली. बाबू भगरे यांचे सर पदवी देणेबाबत चर्चा करताना विरोधकांनी प्रशासनावर दबाव आणत रडीचा डाव खेळला मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला असे सांगितले.खासदार भगरे यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जोमाने कामाला लागा असे सांगत नाशिक जिल्ह्यातील तीनही जागा निवडून दिल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले.संपर्कप्रमुख जयंत दींडे यांचे कामाचेही कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण,संपर्क प्रमुख जयंत दींडे यांचेसह शरद पवारांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम हिरे,पराग भगरे,संदीप भेरे,आश्विन गाजरे पाटील आदी उपस्थित होते.खासदार भास्कर भगरे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत,काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेत त्यांचे आभार मानत मार्गदर्शन घेतले.सिद्धिविनायक मंदिरात जावून दर्शन घेत आशीर्वाद घेतले.