पालखेड बंधारा येथे उद्या दि.१२ जून पासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ...
![पालखेड बंधारा येथे उद्या दि.१२ जून पासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ...](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_66680a490636e.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे वै. ह.भ.प.पाटील बाबा व वै.ह.भ.प.मल्हार महाराजांच्या कृपा आशीर्वादाने उद्या बुधवार दि. १२ जून पासून अखंड हरिनाम हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार असून या सप्ताह मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कलश व गाथा ज्ञानेश्वरी पूजन, विना टाळ मृदुंग पूजन, मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून दररोज पहाटे ४ वाजता काकडा भजन,आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,व रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन होणार असून सप्ताह कालखंडामध्ये बुधवार दि.१२ रोजी अभिजीत महाराज देशमुख,गुरुवार दि.१३ रोजी योगेश महाराज जाधव, शुक्रवार दि.१४ रोजी निवृत्ती महाराज रायते, शनिवार दि.१५ रोजी कृष्णा महाराज कमानकर, रविवार दि.१६ रोजी नरेंद्र महाराज गुरव,सोमवार दि.१७ रोजी वैभव महाराज राक्षे, मंगळवार दि.१८ रोजी निवृत्ती महाराज चव्हाण,बुधवार दि.१९ रोजी भगवान महाराज गतीर (मुंडेगावकर) यांचे सकाळी काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
सप्ताह काळामध्ये सातही दिवस रमेश महाराज अखतवाडेकर, मिलिंद महाराज अजंगवडेल हे गायकवृंद म्हणून साथ देणारा असून तर मृदुंगाचार्य म्हणून रामदास महाराज रसाळ हे साथ करणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या हरीकरितानांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले आहे.