चाकण मधील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या कार्यक्रमात पोलिसांकडून पत्रकारांना नो इंट्री...!

चाकण मधील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या कार्यक्रमात पोलिसांकडून पत्रकारांना नो इंट्री...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : शिंदे गटाचे उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या उदघाटनात पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे पत्रकारांना नो इंट्री दिल्याने पत्रकारांनी कार्यक्रमातून निघून जाण्याची भूमिका घेतली.

चाकण मधील आंबेठाण चौकात भैरवनाथ पतसंस्थेच्या उदघाट्नाच्या कार्यक्रमात पोलीसांनी पत्रकारांना अरेरावी करून पत्रकारांना कार्यक्रमाच्या स्थळी सोडण्यास नकार दिल्याने पत्रकारांनी कार्यक्रमातून निघून जाण्याची भूमिका घेतली. पुणे जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात जर पत्रकारांना प्रवेश दिला जात नसेल तर पत्रकारांना कार्यक्रमाला निमंत्रितच कशाला करायचे असा पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

पत्रकारांना निमंत्रीत करूनही त्यांना पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे कार्यक्रमातून निघून जाण्याची वेळ येत असेल तर, अशा राजकीय कार्यक्रमावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला तर नवल वाटायला नको. या मगरूर पोलीस कर्मचारी जर स्वतःला अधिकारी समजत असेल तर या कर्मचारी याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात येत आहे. या घटनेबद्दल खेड तालुका पत्रकार संघ यांच्याकडुन मगरूर कर्मचारी यांचा जाहीर निषेध केला आहे.