पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी लातूरात भव्य जनसभा...
![पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी लातूरात भव्य जनसभा...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_662e6bbe46a96.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर
महायुतीचे लातूर लोकसभाचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी लातूर येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून पाहता व ऐकता यावे म्हणून या सभेत युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी जनता नेहमीच आतुर असते. म्हणूनच देशाच्या विविध भागात होणार्या त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. लाखो लोक सभास्थळी गर्दी करीत आहेत. पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थितांच्या भावनांची दखल घेत असल्याचे दिसून येत आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता ही सभा होणार आहे. गरुड चौकातून सारोळा गावाकडे जाणार्या रस्त्यालगत 40 एकरवर ही सभा होणार आहे. यासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी केली जात आहे. मंडप उभारणीच्या कामास सुरूवातही झाली आहे. आ. निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे सभास्थळाला भेट देवून पाहणी करीत आहेत . तर या सभेस घटक पक्षांच्या नेत्यांनी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला व तरुणांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.