नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील स्वाती हगवणे हिची महाराष्ट्राच्या रग्बी संघात निवड...!
![नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील स्वाती हगवणे हिची महाराष्ट्राच्या रग्बी संघात निवड...!](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_667ec23935cd9.jpg)
News15 मराठी विशेष प्रतिनिधी
नाशिक(सिन्नर): नाशिक रग्बी असोसिएशनच्या टीमच्या दोन विद्यार्थ्यांनीची महाराष्ट्र राज्य रग्बी संघात निवड झाली आहे. यात सिन्नर तालुक्यातील घोरवड गावातील शेतकरी कुटूंबातील संजय विठोबा हगवणे यांची कन्या स्वाती हगवणे हिची महाराष्ट्र रग्बी संघात निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे..
स्वाती हगवणे हिने वयाच्या १३ वर्षे हा खेळ खेळत होती. तिने या अगोदरही माध्यमिक शालांन्तमध्येही तिने याचं रग्बी खेळात यश संपादक केले आहे. अथक मेहनत, कठोर परिश्रम आणि खेळात सातत्य यामुळे तिने या खेळात नावीन्यपूर्ण यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या टीममध्ये निवडीचे सामने पुणे जिल्ह्यातील बालेवाडी क्रिडांगण येथे पार पडले. यापुढील राज्य पातळीवरील सामनेही बालेवाडी क्रीडागण याचं ठिकाणी होणार आहेत. भविष्यात स्वातीला देशाच्या टीममध्ये खेळण्याचा मानस आहे. तिचा खेळ बघता ती देशाचे प्रतिनिधित्व करेल अशी भावना त्यांच्या मार्गदर्शिका उज्जला घुगे,आकांक्षा कातकाडे यांनी व्यक्त केली आहे. स्वातीचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.