धक्कादायक: अल्पवयीन मुलीला त्याने शिट्टी मारून, घरात ओढले, पुढे तिला बाहू पाशात घेऊन नको ते केले..!
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: सध्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये महिलांच्या बरोबर वेगवेगळ्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यात आता अल्पवयीन मुलींचाही समावेश झाल्याची एक धक्कादायक घटना चाकण परिसरातील कुरुळी गावात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, कुरुळी गावातील सोनवणे वस्तीवर आपल्या आई-वडिलांच्या बरोबर भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहत असलेल्या अतुल देवराव राठोड, रा. कुरुळी, सोनवणे वस्ती, ता. खेड. जि.पुणे नावाच्या तरुणाने इच्छे विरुद्ध अतिप्रसंग करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी १८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ ते ६ वाजताच्या दरम्यान आरोपीच्या राहत असलेल्या खोलीच्या समोरून चॉकलेट घेण्यासाठी जात असताना तिच्याकडे बघून शिट्टी वाजवून तिला थेट हाताला धरून त्याच्या खोलीमध्ये ओढले. त्यानंतर अल्पवयीन पीडित मुलगी आरडाओरडा करायला लागताचा आरोपीने हातातील रुमाल तोंडाजवळ नेवून कोणतेतरी बेशुद्धीचे औषध पीडित मुलीच्या तोंडाला लावून पीडितेला बेशुद्ध केले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या अंगावरील सर्व कपडे काढून पीडितेच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग करून पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी अतुल देवराव राठोड याने केलेल्या क्रूर कृत्याबद्दल आरोपीवर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम ३७६(२)(i), ३२८ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३(अ),४, ५(ह), ६, ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विशेष पथके रवाना करण्यात आले आहेत.
सध्याच्या मागील काही घटना बघता चाकण औद्योगिक वसाहतीत महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या बरोबर नागरिकांनी तितकीशीच जबाबदारी पार पाडायला हवी. परिसरातील खोली मालकांनी आपल्या खोलीत कोण व कुठले भाडेकरू राहतात याची इतंबूत माहिती ठेवणे महत्वाचे आहे. आपल्या भाडेकरूंची पोलिस पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर भाडेकरू यांनीही आपल्या शेजारी कोण व कुठले शेजारी राहतात याचीही माहिती ठेवणे महत्वाचे आहे. अशाच घटनाना आळा घालण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींच्या उपवर वयात येताना होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेऊन नक्की पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे याचेही कुठे तरी आत्मपरिक्षण करायला हवे. पालक, खोली मालक, भाडेकरू व पोलिस यांच्या समन्वयांने अशा घटनांना आळा घालण्यास मदत झाल्याशिवाय राहणार नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड या करत आहेत.