मोठी बातमी : प्लॉट धारकांचा रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी खंडणीची मागणी करणाऱ्या माजी उपभापतीवर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर एकनाथ कांबळे व त्याचा भाऊ अनिल एकनाथ कांबळे यांनी कुरुळी गावातील प्लॉट घेतलेल्या एकूण ३४० नागरिकांचा जाण्या येण्याचा रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी केल्या प्रकरणी अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्यावर रात्री उशिरा महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील(वय-३९ वर्षे),रा.कुरुळी यांच्या माहितीवरून कुरुळी गावातील इंद्रायणी पार्क येथे फिर्यादीने स्वमालकीचा २०२३ साली दोन गुंठे प्लॉट घेतला. फिर्यादीच्या यांच्या बरोबर एकूण ३४० नागरिकांनी इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केला आहे. काही प्लॉट धारकांनी त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातील घराचे बांधकामही सुरु केले आहे. याच प्लॉटला पुणे-नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे त्याचा वहिवाटी करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडून रीतसर करून घेण्यात आला आहे. प्रथम करारनामा इंद्रायणी पार्क विकासक यांचा आणि आरोपी अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने देण्यात आला होता. त्यानंतर तसाच करारनामा विकासक आणि प्लॉट धारक यांच्यात झाला आणि प्लॉटीगसाठी रस्ता देण्यात आला आहे.
रस्ता सुरळीत सुरु असताना खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत ती बांधकामे आम्हालाच द्यायचे इतर कुणाला द्यायचे नाही. त्यामुळे बरायचं प्लॉट धारकांनी अजूनही बांधकामे सुरु केली नाहीत. परंतु याच प्लॉट मधील तब्बसुंम बी शेख साजिद पिंजारी रा.पिंपळे गुरव, राजेश बंकटराव जाधव, रा.मोशी, दिनेश रमेश काकुलते, प्रशांत काळडोके यांनी बांधकाम सुरु केले असून त्यांनी बांधकाम अमर कांबळे यांना न देता प्लॉटधारकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे दिले आहे. याच गोष्टीचा मनात राग धरून अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक मोठा कंटेनरची केबिन आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या गेटवर ठेवला आहे. सदर रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद केला आहे. तसेच अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी तुम्ही बांधकाम कसे करता व प्लॉटवर कसे येता जाता आम्ही बघतोच अशी धमकी देत आहे.
सर्व प्लॉट धारकांनी वेळोवेळी अमर कांबळे व अनिल कांबळे यांना कंटेनरची केबिन काढण्याची विनंती केली पण त्यांनी आम्हाला जेव्हा बांधकामे द्याल तेव्हाच कंटेनरची केबिन काढू असे बोलून धमकावून खंडणीची मागणी केली. यावरून अमर कांबळे व अनिल कांबळे यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३०८(३), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता उपसभापती व त्याच्या भावावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता प्लॉट धारकांचे डोळे बेकायदेशीर लावलेला कंटेनर पोलीस प्रशासन कसे बाजूला करतात यावर लागले आहे. पण या प्रकरणात आता कुणी झारीचा शुक्राचार्य मध्यस्थीची भूमिका बजावतोय का? आणि प्लॉट धारकांवर अन्याय करतो कि काय? असा संशय आता प्लॉट धारक यांना पडला आहे.