अर्धापूर शहरात घाणीचे साम्राज्य.! तर साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपयाची बिले साफसफाई गुत्तेदार उचलत असल्याचा आरोप...

अर्धापूर शहरात घाणीचे साम्राज्य.! तर साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपयाची बिले साफसफाई गुत्तेदार उचलत असल्याचा आरोप...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

अर्धापूर शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य प्रत्येक वार्डामध्ये दिवसेंन दिवस वाढ होत आहे. तामसा कॉर्नर येथील मुख्य रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाला कचऱ्याने भरलेला आहे नगरपंचायत चे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष व नगरसेवक डोळे झाक पणा करतात का असा संताप जनक आरोप व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिनराव येवले यांनी केला शहरामध्ये कुठल्याही जागी स्वच्छता दिसली जात नाही असे म्हटले आहे नगरपंचायत वर मात्र अनेक वर्षापासून एक हाती सत्ता असून सुद्धा शहरा मध्ये स्वच्छता का ठेवली जात नाही असे व्यापाऱ्याकडून बोलले जात आहे काल झालेल्या सतत मुसळधार पावसामुळे नाले तुडूप भरल्याने नाल्याचे पाणी दुकानात शिरल्याने खत व्यापाऱ्याचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असे सांगण्यात आले . वेळेत नाली सफाई रोडवरील करावी शहरांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढेल त्याला सर्वस्वी जबाबदार नगरपंचायत राहणार असे बोलले जात आहे हॉटेल समोरच्या रस्त्यावरच्या घनकचऱ्यमुळे त्यावर बसलेल्या माशा मच्छर हे खाद्यपदार्थावर बसत आहे  मच्छरामुळे व माशामुळे आजार डोकं वर काढू शकेल शरीरातील  नागरिकाचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो असे स्थानिक नागरिकांना बोलले जात आहे . साफसफाई नाही केल्यास आम्ही शिंदे साहेबांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहोत असे बोलले जात आहेत.