आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व मराठी पत्रकार दिन साजरा...

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व मराठी पत्रकार दिन साजरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी

यवतमाळ : स्थानिक कालिका माता मंदिर सभा गृह येथे दि. 6 जानेवारी 2024 रोजी; सायंकाळी 8 वा.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन पाटणबोरी पत्रकार संघटना यांच्यावतीने साजरा करण्यात आला.

यावेळी पाटणबोरी पत्रकार संघटना अध्यक्ष शेखर सिडाम यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकमतचे प्रतिनिधी निलशे यमसनवार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या चारित्र्यवर जन्म व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक अनिल पुलोजवार यांनी केले. सुत्रसंचलन शेखर सिडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष नक्षणे यांनी केले.

यावेळी माजी अध्यक्ष ओमकार डब्बावार, संतोष नक्षणे, रामेश्वर पुदरवार, संदीप सुरपाम, मोबिन तिघाले, गजनान कैलासवार ,शुभम बावणे, हणमंतू सुरावार या सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्तीत हा पत्रकार दिन व बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.