उपविभाग हेडरी अंतर्गत गर्देवाडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना...

उपविभाग हेडरी अंतर्गत गर्देवाडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - ईश्वर परसलवार

गडचिरोली : 1000  सी-60 कमांडो, 25 बिडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले पोलीस मदत केंद्र. पोलीस उपहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन.

ग्रामस्थांनी माओवाद्यांच्या खोट्या कथनाने प्रभावित होऊन त्यांच्या भरकटलेल्या खोट्या क्रांतीला बळी पडू नये या करिता; नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली व या परिसरातील सर्वांगीण विकासमध्ये महत्वाची भूमिका बजावेल - पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील

आगामी सार्वत्रिक निवडणुका व या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण सुरक्षा व सेवेसाठी पोलीस मदत केंद्र गर्देवाडा कटिबध्द असेल - पोलीस अधीक्षक नीलोत्पल.

माओवाद्दृष्ट्या अतिसवेदांशिल गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कार्यवाहिना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाने दि. 15 जानेवारी 2024 रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत गर्देवाडा येते पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका निर्भय व निकोप वातावरणात पार पाडावी आणि या भागांतील आदिवासीं बांधवांचे सर्वांगीण विकास साधावा तसेच या भागातील नागरिकांच्या सुरक्षा व विकासाला हातभार लागून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र गर्देवाडा मोलाची भूमिका बजावेल असा आशावाद व्यक्त केली जात आहे.

सदर पोलीस मदत केंद्र उभारणी करीता गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फोज फाटा तैनात करण्यांत आला होता. त्यात एकूण 1500 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 4 पोकलेन, 45 ट्रक इत्यादींच्या साह्याने एका दिवसात गर्देवाडा येते पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यांत आली. पोलीस बलाच्य सुविधेकरिता पोलीस मदत केंद्रामध्ये वायफाय सुविधा, 20 पोर्टा केबिन, जनरेट्र शेड, पिण्याच्या पाण्याची आरोप्लांट, मोबाईल टॉवर ,टॉयलेट सुविधा, पोष्ट सुरक्षा करिता मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यांत येत असून, या सोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षे करता 4 अधिकारी, 55 अंमलदार, एसआरपिफ ग्रुप 11, डि कंपनी नवी मुंबईचे 2 प्लाटून तसेच सीआरपीएफ 191 बटालियन कंपनीचे एक असिस्टंट कमांडंट व 75 अंमलदार तैनात करण्यांत आले आहेत. तसेच पोमके उभारणी कार्यक्रमादरम्यान महिलांना सलवार सुट, नववारी साडी, पुरुषांना धोतर, युवकांना लोअर पँट- टीशर्ट अश्या अनेक साहित्यांचे वाटप करण्यात आले.