पेंगलवाडी येथील श्री. गुरुचरण सेवा आश्रम येथे 3 दिवसीय श्री दत्त जन्म उत्सव...

पेंगलवाडी येथील श्री. गुरुचरण सेवा आश्रम येथे 3 दिवसीय श्री दत्त जन्म उत्सव...

NEWS15 मराठी  प्रतिनिधी -  बापू चव्हाण

नाशिक : त्रंबकेश्र्वर जवळील पेंगलवाडी येथील गुरुचरण सेवा आश्रम येथे तीन दिवसीय श्रीदत्त जन्मउत्सव महंत राजेश पुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादा प्रमाणे  मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दि.24 ते 26 विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि 24 रोजी सकाळी 9 वाजता धर्म ध्वजारोहण सोहळ्याने उत्साहाचा प्रारंभ झाला. श्रीदत्त जयंती दिवशी मंगळवारी दुपारी 4 ते सहा पालखी सोहळा व भव्य मिरवणूक सायंकाळी 6.32 वाजता दत्त जन्म उत्सव सोहळा होवून रात्री 8 वाजता महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. सोहळ्यास भक्त परिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन गुरुचरण सेवा आश्रम भक्त परिवाराने केले आहे.