कादवा सहकारी साखर कारखान्याची दि. २७ रोजी ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

कादवा सहकारी साखर कारखान्याची दि. २७ रोजी ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याची ५३ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी २ वाजता कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते,प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी दिली. 

कादवाला लेखापरीक्षणात 'अ' वर्ग मिळालेला आहे.अहवाल सालातील आर्थिक लेखाजोखा, तेरीज पत्रक,नफा-तोटा,इथेनॉल प्रकल्पामधील कामकाज,उत्पादन अहवाल,कामगार प्रश्न,चालु घडामोडी,परिसरातील पाणी उपलब्धता,ऊस लागवड वाढ तसेच विस्तारीकरण महत्व व इतर तत्सम बाबींवर वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होणार असून, सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे.उपस्थिती नोंदविण्यासाठी ओळखपत्र (सभासद स्मार्ट कार्ड) सोबत आणावे,असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.