वनी येथे वरूनराजाच्या हजेरीत तुलसी विवाह संपन्न...
![वनी येथे वरूनराजाच्या हजेरीत तुलसी विवाह संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_6565b21734b09.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वणी येथील संताजी चौकात वरूण राजाच्या साक्षीने; तुलासीविवाह उत्साहात पार पाडण्यात आला. संताजी युवक मित्रमंडळ व एकलव्य फ्रेंड्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक तुलासी विवाह साजरा करण्याचे हे पंधरावे वर्ष असून, ती परंपरा आजतागायत जोपासण्यात आली.
यावर्षीही तुलसी विवाह मध्ये मांडव, देवप्रतिष्ठाना, हळद असे संस्कार पारंपारिक पद्धतीने झाले सायंकाळी 7 वा. ला सजवलेल्या रथातून मिरवणूक निघाली मिरवणुकीचे लग्न मंडपात आगमन होताच सुवासिनींनी वेशभूषातील बालकांसह तुळशी व विष्णू भगवान यांच्या मूर्तीचे औक्षण केले. नंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात गोरज मुहूर्तावर ची. सौ.का. तुलसी व ची. भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह झाला वराच्या (श्री विष्णूच्या) मामाचे कर्तव्य ज्ञानेश्वर पवार तर वधूच्या( तुलसी) मामाचे कर्तव्य शामराव सोनवणे यांनी पार पाडले. नंतर कन्यादान झाले पुरोहित सुरेश माळेकर यांनी मंगलाष्टके गाऊन हा तुलसी विवाह फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. भोजनाचा कार्यक्रम होऊन विवाह सर्वपक्षीय नेते संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपालिका सदस्यांसह ग्रामस्थ वऱ्हाडी मंडळी मोठ्या उपस्थित होते. या विवाह सोहळ्यासाठी दोन्हीही मंडळांनी परिश्रम घेतले.