पश्चिम भागातील दमदार पावसामुळे पालखेड धरण ८० टक्के

पश्चिम भागातील दमदार पावसामुळे पालखेड धरण ८० टक्के

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सततधार पावसामुळे तालुक्यातील पालखेड धरण हे ८०  टक्के भरले असून आज दि.3 रोजी सायंकाळी धरणाच्या चौदा गेट पैकी सहा गेट वर करून धरणातून २३४५ कयुसेस पाण्याचा विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

गेल्या कित्येक दिवसापासून तालुक्यात पावसाने वाट पाहायला लावली होती परंतु तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने या धरणांच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.धरण क्षेत्रा लगत असणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.