तळेगाव दिंडोरी येथे मंगळवारी हनुमान यात्रा उत्सव...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे; सालाबादाप्रमाणे मंगळवार दि.०५ मे २०२४ पासून, श्री. हनुमान यात्रा उत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात येत आहे. यात्रा उत्सवानिमित्त गावातील संकट मोचन चैतन्य हनुमान मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
रविवार दि. ०५/०५/२०२४ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत महापूजा दुपारी ४ वाजता हनुमान प्रतिमेची भव्य मिरवणूक होणार असून, यात्रेचे मुख्य आकर्षण सुनिल तिलकधारी आर्ट ग्रुप हरियाणावाले हे असणार आहेत. व रात्री ९.३० वाजता भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.अशी माहिती यात्रा पंच कमिटी यांचे कडून देण्यात आली आहे. यात्रा यशस्वीतेसाठी यात्रा पंच कमिटी व समस्थ ग्रामस्थ आदींसह युवक विशेष परिश्रम घेत आहेत