मोठी बातमी : आळंदी पोलीस ठाण्यातील खुनातील फरारी आरोपी उत्तरप्रदेश येथून जेरबंद, आळंदी पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक..!

मोठी बातमी : आळंदी पोलीस ठाण्यातील खुनातील फरारी आरोपी उत्तरप्रदेश येथून जेरबंद, आळंदी पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

आळंदी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी गावच्या हद्दीतील झालेल्या खुनातील फरार आरोपीला आळंदी पोलिसांनी शिताफीने उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. या कामगिरीमुळे आळंदी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी गावच्या हद्दीतील श्री.स्वामी समर्थ इडस्ठ्रीज प्रा.लिमिटेड कंपनीत येथे मयत विवेक प्रदीप सेन(वय-२२ वर्षे) रा.बर्गे वस्ती,चिंबळी यास किरकोळ कारणावरून भांडण होऊन आरोपी सुरजकुमार हरीलाल दिवाकर(वय-२६ वर्षे),सध्या रा.कुरुळी,मूळ रा. भैल्ला, मझंणपूर,जि.कौशांबी,राज्य.उत्तरप्रदेश याने लोखंडी कॅण्डल फिल्टरने डोक्यात मारहाण करून जीवे ठार मारले.या घटनेनंतर फिर्यादी भिवा रामचंद्र सुरते(वय-४१ वर्षे), रा.लांडगेनगर,भोसरी,पुणे, मूळ रा. सद्लापूर, ता.अक्कलकोट,जि.सोलापूर यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय सहिता कलम १०३(१) प्रमाणे १३ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील परप्रांतीय फरार आरोपी खून करून आपल्या मूळ गावी पळून गेल्याने आरोपीस ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आळंदी पोलिसांच्या समोर होते. पण वरिष्ठांच्या आदेशाने आळंदी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक काकडे,पोलीस हवालदार लोणकर,पोलीस शिपाई दहिफळे तसेच त्यांच्या सहकारी अमलदार यांनी खुनातील आरोपीचा सलग पाच दिवस प्रयागराज,कौशाबी,कानपूर,भैल्ला मंझणपूर राज्य उत्तरप्रदेश येथे कसोशीने शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळून त्यास अटक केली. या कामगिरीचे आळंदी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सदर कारवाई आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके,तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक काकडे, पोलीस हवालदार लोणकर,पोलीस हवालदार वहिल,होले,पोलीस शिपाई नरवडे,दहिफळे,खेडकर,डूमनर,सूर्यवंशी,डीखले,सातपुते यांनी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल हे करत आहेत.