धक्कादायक : एका खाजगी कंपनीच्या कर्मचार्याकडून ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.....!
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावात भाड्याने आईसोबत राहत असलेल्या एक ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहत असलेल्या एका २७ वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या महितीनुसार अत्याचार करणारा आरोपी धंनराज चांगदेव कुरसंगे(वय-२७) रा. देवरी, ता. देवरी, जि. गोंदिया (सध्या रा. खराबवाडी, ता.खेड, जि.पुणे) हा व पीडित मुलीची आई एका खाजगी कंपनीत काम करत असून त्यांची व पीडित मुलीच्या कुटुंबाची घरगुती ओळख झाली होती. या ओळखीतुन आरोपी व पीडित मुलगी यांचे एकामेकाच्या घरी येणे जाणे होते. पीडित मुलीच्या आईचे नवर्या बरोबर पटत नसल्याने पीडित मुलगी व तिची आई या दोघीच रूम करून खराबवाडीत राहत होत्या. आई कामाला गेल्यावर या आरोपीने त्याच संधीचा फायदा घेऊन दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी शाळेतून घरी आल्यावर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
या घटणेनंतर आई सायंकाळी कामावरून घरी आली असता मुलीने तिच्या लघवीच्या जागेवर त्रास होत असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर आई पीडित मुलीला एका खाजगी हॉस्पिटलला घेऊन गेली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २२ जानेवारी २०२३ रोजी उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने आरोपी धंनराज चांगदेव कुरसंगे याच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ३७६(२)(i)(n) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम सन २०१२ चे कलम ३(A), ४, ५(L)(I)(M), ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस महाळुंगे एमआयडीसी पोलिसानी अटक केली आहे. पीडित मुलीला मानसिक धक्का बसला असून पीडित मुलीला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव हे करत आहेत.