वडिलांच्या मृत्यूची बनावट कागदपत्रे सादर करून शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न.! पोलिसांत फसवणुकीची तक्रार...
![वडिलांच्या मृत्यूची बनावट कागदपत्रे सादर करून शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न.! पोलिसांत फसवणुकीची तक्रार...](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63dc9fac65fba.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : वडील जीवंत असतांना ते मयत झाल्याचे बनावट कागदपत्रे सादर करून, शेत जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याची घटना.! मोहोळ तालुक्यातील बिटले गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी तलाठी दादासाहेब सरक यांनी मोहोळ पोलिसात फसवणूकीची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर इन्नुस तांबोळी ( रा. बिंबवेवाडी पुणे ) यांनी बिटले येथील ग्रामपंचायत कार्यालयात २ ऑगस्ट २०२२ रोजी त्याचे वडील इन्नुस बंडुभाई तांबोळी हे; १६ डिसेंबर २०१९ रोजी पुणे येथे मयत झाल्याचे खोटी बनावट कागदपत्रे दाखल करून, त्यांच्या नावावरच्या शेत जमिनीवर आपले वारस नांव लावण्यासाठी अर्ज दाखल केला. त्या कागदपत्रांची पडताळणी करत; बनावट कागदपत्रा वरून वारस दार म्हणून रेहाना इन्नुस तांबोळी, रियाज इन्नुस तांबोळी, शन्नो नशीर तांबोळी आणि समीर इन्नुस तांबोळी यांच्या नावाची नोंद करण्यात आली.
परंतु, हा प्रकार प्रत्यक्ष जिवंत असलेले उतार्यावर मयत झालेले इन्नुस बंडूभाई तांबोळी यांना समजला असता; त्यांनी बिटले येथील तलाठी कार्यालयात हजर राहून उतारा पाहीला. त्यावर वारस म्हणुन दुसरीच नावे त्यांना आढळली. त्यामुळं हा बनावट कागदपत्राद्वारे केलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी ९ डिसेंबर २०२२ शेत जमिनीचा उतारा चुकीचा असून, तो दुरुस्त करून मिळण्याची मागणी केली. त्याप्रमाणे बिटले ता. मोहोळ येथील तलाठी दादासाहेब सरक यांनी मोहोळ पोलिसात समीर इन्नुस तांबोळी ( रा.बिबवेवाडी पुणे ) यांच्या विरुद्ध बनावट कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र सादर करून, बिटले येथील वडिलांची शेतजमीन आपल्या नावावर करून शासनाची फसवणूक केली अशी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस उपनिरीक्षक डुणगे करीत आहेत.