बावनथडी नदी पात्रातील चचांदमारा वाळू घाटावर तुमसर उपविभागीय अधिकाऱ्यांची करवाई...

बावनथडी नदी पात्रातील चचांदमारा वाळू घाटावर तुमसर उपविभागीय अधिकाऱ्यांची करवाई...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदी पात्रातून काल दि.20 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास; अवैध वाळू उपसा करताना 2 जेसिबी मशीन आणि ट्रक तुमसर उपविभागीय अधिकारी यांनी करवाई करत जप्त केले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीची वाळू दर्जेदार असल्याने या वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी वाळू माफिया काही अधिकाऱ्यानंसोबत साठगाठ करुण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत; जेसीबी मशीनद्वारे नदिमधून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. तर काही दिवसापूर्वी तुमसर येथे रुजू झालेले उपविभागीय अधिकारी यांना माहिती मिळाली की, बावनथडी नदी पात्रातील चांदमारा वाळू घाटावर जेसीबी मशीनच्या साहाय्याने उपसा सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गोपनीय पद्धतीने वाळू घाटावर धाड टाकत 2 जेसीबी, 6 वाळूने भरलेले ट्रक काल दि. 20ऑक्टोबर रोजी जप्त करत कारवाही केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.