सततच्या तक्रारी आणि खोडकरपणाला बाप कंटाळला.! विष पाजून घेतला मुलाचा जीव

सततच्या तक्रारी आणि खोडकरपणाला बाप कंटाळला.! विष पाजून घेतला मुलाचा जीव

NEWS15 मराठी रिपोर्ट - सोलापूर

मुलगा अभ्यास करत नाही. नेहमी खोड्या काढतो आणि सतत मोबाईल मागतो या कारणासाठी वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय सिद्राम बट्टू (४३) असं आरोपी बापचे नाव असून, त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता; विजयने ही कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरातील आहे. या भागात राहणारे विजय बट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रातीच्या दिवशीच कोल्ड्रिंगमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विजय बट्ट यांनी संक्रातीच्या दिवशी मुलगा कीर्ती बट्ट याला निर्मनुष्य ठिकाणी नेले व कोल्ड्रिंगमध्ये सोडीयम नायट्रेंटची पावडर मिसळून त्याला प्यायला दिले. १५ दिवसांपुर्वी ही घटना घडली होती मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. अखेर १५ दिवसांनी आरोपीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

२८ तारखेला पत्नीसोबत झालेल्या भांडणात विजय बट्टूने उडतउडत सांगितलं होतं की त्यानेच मुलाला मारलंय. त्यानंतर पत्नीचा संशय बळावला. तिने पोलिसात जाऊन यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी विजय बट्टूला अटक करत त्याची चौकशी सुरु केली होती. सुरुवातीला तो पोलिसांशी सहकार्य करत नव्हता. उडवाउडवीचे उत्तरं देत होता. पण, पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी खाक्या दाखवताच तो बोलता झाला. आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपल्या मुलाची हत्या केलेल्या बापावर संताप व्यक्त केला जात आहे.