बहिरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. जयश्रीताई राक्षे यांची निवड...

बहिरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. जयश्रीताई राक्षे यांची निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, चाकण

बहिरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. जयश्रीताई निवृत्ती राक्षे यांची निवड झाली आहे. मावळते उपसरपंच कु. नितेश तुकाराम राक्षे यांनी राजीनामा दिल्यामुळे; हे पद रिक्त झाले होते.

दि. २० मार्च रोजी ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडणूक विशेष सभेमध्ये फक्त एकच अर्ज आल्यामुळे, निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विध्यमान सरपंच सौ. वसुधाताई अंकुश राक्षे व श्रीमती शारदा पवार ग्रामसेविका यांनी कार्यभार सांभाळला. तसेच माजी लोकनियुक्त सरपंच श्री. जगन्नाथ विठ्ठल राक्षे यांनी सुत्रसंचालन केले.

यावेळी पंचायत समिती खेडचे माजी सभापती अंकुश सुदाम राक्षे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. वसुधा अंकुश राक्षे, ग्रामसेवक श्रीमती शारदा पवार, माजी उपसरपंच बाजीराव विठ्ठल राक्षे, कु.नितेश तुकाराम राक्षे, ग्रा.पं.सदस्य अनिल शिवाजी भालेराव, कु.सायली बाळासाहेब राक्षे, सौ.राजश्री भिकुशेठ बोऱ्हाडे, सौ.मिलाबाई रोहिदास भालेराव, मा.उपसरपंच बारकू नामदेव वाघुले, मा. ग्रामपंचायत सदस्य जीवन राक्षे तसेच सामाजिक कार्यकर्ते दशरथ विठोबा शेडाणे, भिकुशेठ शिवाजी बोऱ्हाडे, सचिन बाबुराव राक्षे, शुभम बाळासाहेब राक्षे, श्रावण राक्षे, अमोल राक्षे, बाळासाहेब राक्षे, प्रसाद राक्षे, अविष्कार राक्षे, हर्षद बोऱ्हाडे, सौरभ राक्षे, साहेबराव राक्षे, प्रशांत राक्षे गणेश शेडाणे, सिद्धू दगडगावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.