गणेशजीच्या देखाव्यातून दाखवले निसर्ग प्रेम...

गणेशजीच्या देखाव्यातून दाखवले निसर्ग प्रेम...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - दीनदयाल गिरेपुंजे, लाखनी

दि. १९ सप्टेंबर ला गणेशचतुर्थी निमीत्त लहान गल्ली  गणेश मंडळ जेवनाळा येथे; श्री गणेशाची मंत्रोपचाराने विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशी अशा 10 दिवसांच्या या सार्वजनिक उपक्रमामधे, भजन कीर्तन, अंताक्षरी, चित्रकलास्पर्धा, निबंधस्पर्धा, गीतगायन स्पर्धा व महिलांसाठी हळदी कुंकू व ग्रामस्वच्छता अभियान विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येणार आहे. 

ह्या गणेश परिसरात नयनरम्य देखावा साकार करण्यात आलेला असून, गणेशाच्या दर्शनाकरिता व मनोहर देखावा पाहण्यासाठी  भावीकांची गर्दी उसळत आहे,तसेच गणेश  मंडळाच्या परीसरात स्वच्छतेची विशेष  काळजी घेण्यात आली असून, ठीक-ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध  संदेश लिहलेले असून, त्यांचे पालन करण्याचे आवाहन  मंडळामार्फत करण्यात  येत आहे.