तावरजा मध्यम प्रकल्पातून विसर्ग कमी... पाण्याची आवक पाहून पुढील निर्णय...

तावरजा मध्यम प्रकल्पातून विसर्ग कमी... पाण्याची आवक पाहून पुढील निर्णय...

लातूर - तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन, पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले आहेत.

तावरजा नदीपात्रात विसर्ग कमी करण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत एकूण 4 उचल द्वारे 10 सेंटिमीटर ने चालू आहेत. एकूण 401 क्यूसेक्स (11.36 क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.

तर धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. पुरनियंत्रण कक्ष, तावरजा मध्यम प्रकल्प तावरजा यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

तरी.! नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.