निलेश घायवळ टोळीचा डाव उघड.! पोलिसांच्या कारवाईपूर्वीच इंग्लंडला पलायन...

निलेश घायवळ टोळीचा डाव उघड.! पोलिसांच्या कारवाईपूर्वीच इंग्लंडला पलायन...

पुणे : शहरातील गँगवॉरमध्ये कुप्रसिद्ध निलेश घायवळ टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार करून एकाला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली होती. त्यानंतर टोळीप्रमुख निलेश घायवळवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यात आला.

पोलिसांनी घायवळच्या कोथरुडमधील घरावर छापा टाकला असता, तो आधीच गायब झाल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे घायवळ थेट इंग्लंडमध्ये पळून गेल्याची माहिती उघड झाली आहे.

 पोलिसांनी घरातून दोन दुचाकी व दोन SUV कार जप्त केल्या आहेत.

घायवळचा पासपोर्ट जप्त न झाल्याने त्याने विदेश गाठल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचा मुलगा इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असल्याने तो तेथेच गेल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी त्याच्यावर लूक आऊट नोटीस जारी केली असून, तो परतताच त्याला अटक केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, पुढील कारवाईकडे नागरिक व कायदा-सुव्यवस्था यंत्रणांचे लक्ष लागले आहे.