ईद निमित्त खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा.! तर जिल्ह्यातील सर्व धर्मियांनी एकोप्यानी राहूअशी मनोकामना...

ईद निमित्त खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा.! तर जिल्ह्यातील सर्व धर्मियांनी एकोप्यानी राहूअशी मनोकामना...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

प्रेम, शांतता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या "रमजान ईद" या पवित्र सणानिमित्त आज दयानंद महाविद्यालय नजिकच्या ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो यासाठी सुधाकर शृंगारे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सर्व धर्मियांनी एकोप्यानी राहु असा शुभ संदेश दिला.

या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष  देविदासजी काळे, भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष गणेश गोमचाळे, निखिल गायकवाड, शैलेश भडीकर यासह अनेक पदाधिकारी आणि मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.