महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात?
![महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात?](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_64f1cb2d29b43.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बालाजी घडबळे, नांदेड
चिंचगव्हाण येथील भर वस्तीत असलेल्या लोंखडी पोलचा शाॕक लागून, शेख मनान शेख दौलत यांची शेळी दगावली. सदर पोलवर चिमण्यांनी घरटे केले असून, घरटे मुख्य तार व पोलला चिकटुन असल्याने पाऊस चालू आसतांना या पोलमध्ये विद्युत प्रवाह येत आहे.
या बाबत महावितरणला सूचना देऊनही याकडे गांभिर्यांने लक्ष न दिल्यानेच हा प्रकार घडला असल्याचे बोलल जात आहे. गावात असलेले रोहीत्र सुद्धा उघडेच असल्याने गावकऱ्यांचा जिव धोक्यात आहे. त्यामुळं महावितरणचा हलगर्जीपणा आतापर्यंत कीतीतरी मुक्या जनावरांसह माणसांना यम सदनी पाठवण्यात यशस्वी झाला असून, अजून कीती जनांचे प्राण गेल्यावर महावितरणला त्यांच्या कर्तव्याची आठवण होईल अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.