मतदान जनजागृती साठी - एक दिवा मतदानासाठी.! दिंडोरी नगरपंचायत'चा उपक्रम
दिंडोरी शहरात दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने एक दिवा मतदानासाठी उपक्रम राबवून मतदान जनजागृती नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदिप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत नागरिकांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे.
दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने विविध उपक्रम व कार्यक्रम होत आहे.दिवाळी सणाच्या निमित्त एक दिवा मतदानासाठी अभियान व्यावसायिक,रहिवासी क्षेत्रात राबविण्यात आला.नागरिकांनी रात्रीच्या वेळी एक दिवा पेटवून स्वीप नावाची पेटत्या पणत्यांची रांगोळी तयार केली.यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदिप चौधरी, अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.