दिंडोरी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न...
![दिंडोरी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64d4af83e9102.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी शहरासह तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिंडोरी येथे आदिवासी दिनाचे औचित्य साधत; रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडोरी शहरासह तालुक्यात जागतिक आदिवासी दिन पारंपरिक वेशभूषा करीत उत्साहात साजरा करण्यात आला. दिंडोरी शहरात जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक जागोजागी दिसत होते. दिंडोरी येथील बसस्थानक परिसरात झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा मेघा धिंदळे, उपनगराध्यक्षा लता बोरस्ते, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत नवसंजीवन ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील युवकांना यावेळी सामाजिक भावनेतून रक्तदान केले.