दिंडोरी प्रांत कार्यालयाचे कामकाज नवीन इमारतीत सुरू...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी पेठ विभागीय कार्यालय तथा प्रांत कार्यालय नाशिक - कळवण रोड वरील पोलीस स्टेशन च्या शेजारी नवीन सुसज्ज अशा इमारतीत कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
शासकीय अधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीत वास्तूची पूजा करून कामकाज सुरू करण्यात आले आहे.दिंडोरी व पेठ तालुक्यातील तमाम नागरिक,शासकिय / निमशासकिय कार्यालये व सर्व सबंधीतांना जाहिरपणे कळविण्यात येते की, उपविभागीय अधिकारी दिंडोरी, उपविभाग दिंडोरी यांचे कार्यालय वाघाड इरिगेशन कॉलनी दिंडोरी येथुन दिनांक ११/०३/२०२४ पासुन नाशिक-कळवण रोडवरील तहसिल कार्यालय दिंडोरी शेजारील नूतन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यांत आले आहे. तरी नागरिकांनी स्थलांतरीत नविन ठिकाणी शासकिय कामकाजासाठी संपर्क नंबर 02557 / 295099 यावर संपर्क साधावा व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.