चापोली.! संजीवनी महाविद्यालय जवळील बोगद्यासाठी जिल्हाधिकारी सकारात्मक, लवकरच निर्णय...
![चापोली.! संजीवनी महाविद्यालय जवळील बोगद्यासाठी जिल्हाधिकारी सकारात्मक, लवकरच निर्णय...](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63e4c2255a4bd.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख
लातूर : चाकुर तालुक्यातील चापोली - येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१ जात आहे. परंतु महामार्ग जात असताना संजीवनी महाविद्यालयाजवळ विद्यार्थ्यांना ये जाण्यासाठी एक बोगद्याची आवश्यकता असल्याचे; अनेक चापोलीकरागची भावना लक्षात घेऊन.! चाकूर - अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्याशी पत्र व्यवहार करून, या ठिकाणी बोगदा करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले होते.
चाकूर - अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विनंतीला मान देऊन लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी आज संजीवनी महाविद्यालयाच्या व अन्य विद्यार्थ्यांसाठी ये जा करने व बोगद्यासाठी पाहणी केली. या पाहणीनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षितेसाठी बोगदा आवश्यक्य असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले. त्यांनी या संदर्भात तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, गटशिक्षणविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या निर्देशानुसार लवकरच अहवाल सादर केल्यानंतर चापोलीकरांना अजून एका बोगदा मिळेल यात कुठलीही शंका नसल्याचे सुद्धा सर्वसामान्य चापोलीकरातून बोलले जाते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी हे चापोली येथे आल्यानंतर त्यांचा संजीवनी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉक्टर धनंजय चाटे आणि सरपंच तथा उपप्राचार्य डॉक्टर भालचंद्र चाटे यांनी सत्कार केला. यावेळी अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, भूसंपादन अधिकारी जीवन देसाई, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनिल पाटील, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे सह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.