वरवंडी येथे शाळेत मुक्तक्लास व जॉगिंगचे ट्रॅकचे भूमिपूजन...

वरवंडी येथे शाळेत मुक्तक्लास व जॉगिंगचे ट्रॅकचे भूमिपूजन...

प्रतिनिधी -बापू चव्हाण, नाशिक

वरवंडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये गार्डन मध्ये मुक्त क्लास घेण्यासाठी फेवर ब्लॉक बसवण्यासाठी व दररोज सकाळी व सायंकाळ गावातील नागरिकांना व्यायामासाठी फिरण्यात यावा या करीता जॉगिंग ट्रॅक असावा म्हणून उपसरपंच राजश्री जाधव यांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते या कामाला अखेर यश आले. तरी या 10 लक्ष रुपय निधी मिळाला असुन यांच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद शाळेच्या कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत तसेच ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  

यावेळेस शालेय समितीचे अध्यक्ष रंगनाथ धुळे व उपसरपंच राज्यश्री जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच राजश्री जाधव, सदस्य मधुकर केंग, रंजना केंग, संदीप बर्वे, शालेय समितीचे सदस्य रंगनाथ धुळे, भाऊसाहेब बर्वे, तेजस केंग, गवळी ताई, कीर्तीबाई बर्वे, कार्तिकी बर्वे, बाळू धुळे, आलका सोनवणे, शिक्षक रत्ना भोसले, तुषार पवार, संभाजी घोरपडे आदींसह विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते.