वडनेर भैरव येथे द्राक्ष फळबाग चर्चासत्र

वडनेर भैरव येथे द्राक्ष फळबाग चर्चासत्र

प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक

चांदवड तालुक्यातील वडनेर  येथे शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चर्चासत्र होणार असून यावेळी द्राक्ष फळबाग छाटणी याविषयी विजय कुंभार हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्च करून द्राक्ष बागेचे चांगले उत्पादन कसे घ्यावे, द्राक्ष बागेची फळ छाटणी पूर्वी कोण कोणत्या गोष्टी कराव्या, पूर्व नियोजन, काडीची परिपक्वता कशी ओळखायची,माती,पाणी,पान,देठ परीक्षण,दर्जेदार उत्पादन कमीत कमी खर्चात कसे घ्यावे याविषयी  मार्गदर्शन तसेस पोंग्यातील घड जिरणे समस्या,जीए बद्दल समज गैरसमज,फ्लॉवरिंग मधील गळकुज, द्राक्ष बागेची पाने तजेलदार कशी ठेवावी याबाबत तासगाव येथील यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे द्राक्ष तज्ञ विजय कुंभार यांचे वडनेर येथील चर्चासत्रात मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी मंजुळा मंगल कार्यालय येथे शुक्रवार दि.२० रोजी सायंकाळी पाच वाजता  चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन निखिल ऍग्रोचे संचालक बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.