BIG BREAKING : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त बदलले, तर विश्वास नांगरे पाटील यांना प्रमोशन मिळाले...!

BIG BREAKING : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त बदलले, तर विश्वास नांगरे पाटील यांना प्रमोशन मिळाले...!

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

पुणे : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने मंगळवारी राज्यातील ४१ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्यातील पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, अमरावती, नाशिक या प्रमुख शहरांना नवीन पोलीस आयुक्त देण्यात आले आहेत. तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली.....

अप्पर पोलीस महासंचालक :

सदानंद दाते - अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

विश्वास नांगरे-पाटील - अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई [पदोन्नतीने] (श्री. विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

मिलिंद भारंबे - पोलीस आयुक्त, नवी मुंबई [पदोन्नतीने]

राज वर्धन - अपर पोलीस महासंचालक- नि- सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. [ पदोन्नतीने]

विनय कुमार चौबे - पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड [पद उन्नत करुन]

अमिताभ गुप्ता - अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई

निकेत कौशिक -अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (श्री. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)