अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षाच्या सश्रम कारावास....!
News15 मराठी प्रतिनिधी साहिल रामटेके
भंडारा : घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २५ वर्षीय तरुणाला तीन वर्ष सश्रम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडली असून दीपक गोपीचंद मेश्राम (रा. गोसेबूज) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. हा निर्णय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. पी. बी. तिजारे यांनी बुधवारी सुनावला आहे.
पीडित मुलगी ही १९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळीच्या सुमारास घरी एकटीच होती. यावेळी दीपक मेश्राम हा तिच्या घराच्या अंगणात उभा होता. मुलाला पाहून मुलीने घराच्या समोरील दरवाजा बंद केला. तेव्हा दीपकने दरवाजाला दगड मारून दरवाजा खोल असे म्हणत पायरीवर बसून होता.
मुलगी ही घाबरून मागील दरवाजाने बाहेर जायला लागली तेव्हा दीपकने मुलीचा हात पकडून तिला ओढून घराच्या समोरील अंगणात नेले तसेच तिचा विनयभंग केला. याचवेळी पीडित मुलीची आई आल्याने तिला सोडले तसेच मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली होती.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सरकार पक्षाकडून न्यायालयात खटला चालविताना कायद्यानुरूप कौशल्यपूर्ण मांडणी करण्यात आली. यासाठी अँड. दुर्गा तलमले यांनी पीडित मुलीची बाजू उचलून धरली. हीच महत्त्वाची भूमिका बजावल्याने पीडित मुलीला न्याय मिळाला.