देहूफाटा, आळंदी येथे कौटुंबिक वादातून तरुणास बेल्टने मारहाण...
प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, आळंदी
देहूफाटा परिसरातील तापकीर गल्ली नं. २, आळंदी येथे रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी सुमारे ७.३० वाजता कौटुंबिक वादातून एका तरुणाला बेल्टने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
या प्रकरणी यंकटी मानिक मुंडे (वय ३०, रा. खांदवे नगर, लोहगाव; मूळ रा. अंतवेली, परभणी) यांनी दिघी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार नारायण धनराज घुगे (वय ४२, रा. होल, बीड), रंजना श्रीराम मुंडे (वय ४६, रा. कोठारबंद, बीड), अर्चना वडजु दहिफळे (वय ४४, रा. देहूफाटा, आळंदी) तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी ज्ञानेश्वरी हिला तिची बहीण रंजना आणि अर्चना यांनी घराबाहेर काढून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी फिर्यादी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, त्यांचे चुलत सासरे नारायण घुगे व एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले. नारायण यांनी कमरेचा लेदर बेल्ट काढून मारहाण केली. बेल्टच्या लोखंडी बक्कळ लागल्याने फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.