एका स्वयंघोषित पत्रकाराला चाकण ग्रामीण रुग्णालयात चोपले...!

एका स्वयंघोषित पत्रकाराला चाकण ग्रामीण रुग्णालयात चोपले...!

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड

चाकण : स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्या स्वयंघोषित पत्रकाराला चाकण ग्रामीण रुग्णालयातील १०८नंबरच्या रुग्णवाहिकेच्या चालकांना अपशब्द बोलला म्ह्णून चांगलाच चोप दिल्याची घटना (दि.१३) ला सायंकाळी रुग्णालयाच्या आवरात घडली.

चाकण ग्रामीण रुग्णालयात १०८ नंबरच्या रुग्णवाहीकेचा चालक रुग्णालय आवारात बसला असताना हा स्वयंघोषित पत्रकार तिथे येऊन त्या चालकांवर रुबाब करू लागला. पत्रकार असल्याने चालक विनंती पूर्वक बोलत असताना हा पत्रकार त्यावर अरेरावी करू लागला. हे चालकाला सहन न झाल्याने चालकाने स्वयंघोषित पत्रकाराची उत्तम प्रकारे धुलाई केली. ही धुलाई बघायला रुग्णालयाच्या आवरात बघ्यांची गर्दी जमली होती.

स्वयंघोषित हा असेच सरकारी कार्यालयानी जाऊन रुबाब झाडत असतो. पण काल त्याचा रुबाब त्याच्यावरच पलटल्याने अक्षरशः या पत्रकारांची पळताभुई थोडी झाली होती. त्यानंतर या प्रकरणार एका स्थानिक नेत्याने मध्यस्थी करून या स्वयंघोषित पत्रकाराला घरी पाठवले. या स्वयंघोषित पत्रकाराला चालकाने असा चोप दिला की, पत्रकारांच्या अंगातील शर्टाला एकही बटन राहिले नसल्याचे प्रत्येक्षी दर्शिनी सांगितले. हा पत्रकार कायमच कुणाच्या ना कुणाच्या प्रकरणात नाक खुपसत असतो. बऱ्याच प्रत्येक्षदर्शी यांनी बरे झाले याला चोपले अशी समाधान कारक प्रतिक्रिया दिली.

या घटनेतून बोध घेऊन यापुढे तरी हा स्वयंघोषित पत्रकार सुधारून घेईल हिच अपेक्षा.