दिंडोरीतील शिवाजीनगर पारिसरात स्त्री जातींचे अर्भक सापडल्याने खळबळ...!

News15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरीतील शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेत मंगळवारी (दि.१६ जानेवारी) तीन दिवसांचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली हाेती. स्री जातीच्या अर्भकास पाेलिसांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवत तपास सुरु केला होता.
परिसरातीलच एका १३ वर्षाच्या मुलीने हे अर्भक फेकल्याचा प्रकार समाेर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलगी व अतिप्रसंग करणारा संतोषकुमार सैनी (५८,रा.कानपूर, उत्तरप्रदेश,ह.मु. दिंडाेरी) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस काेठडी सुनावली आहे.
दिंडाेरीत हा प्रकार उघड झाल्यानंतर सुरूवातीस नकोशी म्हणून जन्मदात्रीनेच टाकल्याचा संशय पोलिसांना आला होता. कुठलाही पुरावा नसताना पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनिरीक्षक मोनिका जजोट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी.एन. देशमुख,पी.एन.गारुंगे यांनी छडा लावला. शिवाजीनगर येथे दि.१६ जानेवारीला सकाळी बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला हाेता. या अर्भकास पोलिसांनी प्रथम दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले हाेते. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता एका १३ वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती मिळाली. मुलीला ताब्यात घेत चौकशी केली असता शेजारी राहणारा संतोषकुमार सैनी यानेच मुलीवर अतिप्रसंग केला हाेता. मुलगी नऊ वर्षाची हाेती तेव्हापासून ती संतोषकुमारच्या घरी शिकवणीसाठी जात होती. मागील वर्षी सहावीत असताना मुलीने शाळा सोडली हाेती. तिला कामानिमित्त घरात बोलवत अतिप्रसंग करत तिला गर्भवती केले. मंगळवारी बाळाला जन्म देऊन त्या मुलीने ते बाळ शिवाजीनगर परिसरात फेकून दिले होते. पाेलिसांनी संतोषकुमार सैनी यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.