गोदावरी अर्बन उमरखेड शाखेचा 7 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

गोदावरी अर्बन उमरखेड शाखेचा 7 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

दि. 6 ऑक्टोंबर रोजी गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या सभासदांना, ठेवीदारांना, कर्जदारांना नवं नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाज उपयोगी कार्य करीत आहे. सध्या संस्थेचे कार्यक्षेत्र सह राज्यात असून, संस्थेच्या ठेवी 2200 कोटीच्या वर आहेत. अध्यक्षा सौ. पाटील मॅडम आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर यांच्या मार्गदर्शनात संस्थेची उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे.

शाखा उमरखेड च्या 7व्या वर्धापन दिनाच्या निमित्याने संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय पाटील मॅडम, व्यवस्थापकीय संचालक आदरणीय धनंजय तांबेकर सर, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे मॅडम तसेच वरिष्ठ व्यवस्थापक श्री रवि इंगळे सर सर्वांच्या मार्गदर्शनात आज सामान्य कुटुंबतील विद्यार्थिनीची शाळा म्हणून समजल्या जाणारी जिल्हा परिषद मध्यामिक कन्या शाळा मधील होतकरू विद्यार्थिनींना कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कीट वाटप करण्यात आल्या. या कबड्डी कीट च्या माध्यमातून खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊ शकले. त्याबद्दल विद्यार्थिनीच्या तर्फे शाळेचे मुख्याध्यापक श्री पाखरे सर यांनी अध्यक्षा पाटील मॅडम, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर यांच्या सह उमरखेड शाखेचे आभार व्यक्त केले.

त्यावेळी शाखा व्यवस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी गोदावरी अर्बन संस्थेची माहिती सर्वांना देऊन गोदावरीच्या कामगिरी बदल सर्वांना अवगत केले त्यावेळी  उप शाखा व्यवस्थापक राहुल देशमुख यांच्यासह पराग देशपांडे,रितेश गिरी,निखिल शुक्ला व शिक्षक वृंद उपस्थित होते