कौतुकास्पद : बहुल येथील दरोड्यातील आरोपीना जीवाची पर्वा न करता जेरबंद केल्याच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल, चाकण पोलिसांचा गौरव...

कौतुकास्पद : बहुल येथील दरोड्यातील आरोपीना जीवाची पर्वा न करता जेरबंद केल्याच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल, चाकण पोलिसांचा गौरव...

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुल गावातील वाडेकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपीना शीताफिने अटक केल्या बद्दल चाकण पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा बहुल ग्रामस्थांच्या वतीने गावात जाहीर सत्कार करून गौरव करण्यात आला.

बहुल गावातील सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपीना पकडण्यासाठी गेलेले पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार तसेच चाकण शोध पथकाचे(डिबी) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्यावर आरोपीनी प्राणघातक हल्ला चढवला. आरोपीने केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करत आपल्या जीवाची बाजी लावून पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी आरोपीना जेरबंद केले. या थरारक घटनेत उपायुक्त पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड गंभीर जखमी झाले आहेत. 

आपल्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य प्रामाणिक पार पाडणाऱ्या पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सर्व सहकार्याचा कृतण्यता गौरव सोहळा बहूळ गावातील ग्रामस्थांनी आयोजित केला होता. या सोहळ्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांच्या सर्व टीमचा शाल, श्रीफळ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील ग्रामस्थ यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे उपस्थित होते.