के.व्ही.एन. नाईक विद्यालयात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम 2023 अंतर्गत, नव मतदार नोंदणी अभियान...

के.व्ही.एन. नाईक विद्यालयात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम 2023 अंतर्गत, नव मतदार नोंदणी अभियान...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने; आज विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत नव मतदार नोंदणी अभियान पार पडले. श्री.आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. या अभियानात जनता इंग्लिश स्कूल- दिंडोरी,  गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, अध्यापक महाविद्यालय दिंडोरी तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात दिंडोरीचे प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले. लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्विफ्ट कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यांमध्ये दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी मतदार जनजागृती व मतदार नोंदणी अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 30/11 /2023 रोजी दिंडोरी तालुक्यातील 15 महाविद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मतदार जनजागृतीचे मोहीम यशस्वी करण्याबाबत आवाहन केले. मतदान करणे हे आपले मूलभूत कर्तव्य समजून हक्क बजावणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रांतअधिकारी  आप्पासाहेब शिंदे यांनी केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला एक व्यक्ती एक मत हा पवित्र अधिकार दिला आहे. म्हणून प्रत्येकाने मतदार म्हणून नावनोंदणी करून मतदान करणे आवश्यक आहे. शासनाच्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी सकारात्मत प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी, शिक्षण विस्ताराधिकारी पगार, आहीरे, चव्हाण, दिंडोरीचे मंडल अधिकारी भारती रकीबे, नायब तहसीलदार मोती राय, प्राचार्य डॉ.संजय काळोगे तसेच पंचायत समिती व महसूल विभागाचे  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी साबळे यांनी केले.