पाटणबोरी येथे प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन...
![पाटणबोरी येथे प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_653375a2d634a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजु कैलासवार, पाटणबोरी (पांढरकवडा)
राज्यात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले. यामध्ये पाटणबोरी येथील केंद्राचा समावेश आहे.
या केंद्रामध्ये स्थानिकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्य विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सैनिक आधी दूरदृष्श प्रणालीच्या द्वारे उपस्थित होते.
हा सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी रेड्डी स्कूलच्या भव्य पटांगणामध्ये व्यवस्था करण्यात आली होती. या पटांगणामध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी तसेच आमदार संदीप धुर्वे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या. रेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सुरेश रेड्डी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.