मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्हा दौऱ्यावर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्हा दौऱ्यावर...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बुधवार २४ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी १.३० वाजता हेलिकॉप्टरने औसा येथे आगमन होईल. दुपारी २ वाजता ते उजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील व औसाकडे प्रयाण करतील.

औसा येथून दुपारी ३.१० वाजता हेलिकॉप्टरने निलंगा तालुक्यातील नणंद येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी ३.४५ वाजता औराद शहाजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर नणंद येथून हेलिकॉप्टरने लातूरकडे प्रयाण करतील.

सायंकाळी ५.१० वाजता लातूर येथून विमानाने प्रयाण करतील.