बहुजन समाज पार्टीचा ओबीसी जनगणना आक्रोश आंदोलनाला जाहीर पाठिंबा...
![बहुजन समाज पार्टीचा ओबीसी जनगणना आक्रोश आंदोलनाला जाहीर पाठिंबा...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6506b4030ea93.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक/अर्जुनी
दि. 18 सप्टेंबर रोजी गोंदिया येथे होणाऱ्या ओबीसी जनगणना आक्रोश आंदोलनाला; बहुजन समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. दि. 16 सप्टेंबर रोजी राज सभागृह सडक/अर्जुनी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बहुजन समाज पार्टीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
ओबीसी समाजाला त्यांचे आरक्षण पूर्णपणे मिळालेच पाहिजे. तसेच त्यांच्या आरक्षणांमधून दुसऱ्या कोणालाही आरक्षण देऊ नये, मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवून आरक्षण मिळावे; अशी माहिती पत्रकार परिषदेत लेखी निवेदना्वारे देण्यात आली आहे.
यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष दिनेशसिंग गेडाम, संघटन मंत्री सतीश वैद्य, जिल्हा सचिव अनिल बावणे, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कैलास राऊत, महासचिव कमलेश लाडे, बी. व्ही. एफ'चे संयोजक लोकेश कोसलकर हे उपस्थित होते.